टीमचे हसते चेहरे
राजधानी दिल्लीला, शिवगंगेचे सकाळी ७.४० हे शेडूल टाईम असल्याने आम्ही सगळे लवकर उठून सात पर्यंत तयार झालो, पण अजून अलिगढ सुद्द्धा आले नव्हते, गाडी तब्बल पांच तास लेट होती, मार्गात कोठेतरी कांहीतरी अघटीत झाल्याने ही दिरंगाई. शी.........., नेमकी आपली गाडी लेट, काय करायचे, आता कसे वगैरे अनर्थक बोलण्याशिवाय आमच्या हातात कांही नव्हते .' भूक नाही, पण शिदोरी असावी ' म्हणतात, त्या नुसार आमच्या कडे बरेच खाद्य पदार्थ असल्याने नाश्त्याची पंचाईत झाली नाही हे खरे. साधारण दुपारी १.३० ला दिल्ली गाठली, V I P पार्किंग मध्ये आमची नेहमीची टेम्पो जितु (वाहन चालक) सोबत आमची वाट पहात होती. प्रत्येकाने आपापल्या सीटचा ताबा घेतला, गाडीने कत्राच्या दिशेने धाव घेतली.
गाडीने कितीही गती घेतली तरी, कमीतकमी १२ तास कत्राला जाण्यास लागणार होते, शिवाय जेवणासाठी एखादा तास , म्हणजे रात्र भराचा प्रवास आवश्यक होता, प्रयाणास सुरुवात केली, सोनीपत, पानिपत करत, एक धाबा गाठला, धाबा बर्यापैकी होता, पण जेवण मात्र अंकुश चौधरी, I mean "झकास". गणेश व श्वेता सोडून सगळे वयस्क होते, पण सगळ्या सिनिअरचा उत्साह दांडगा होता, कोणाची कोणतीही तक्रार नाही, गाडी लेट झाली ह्यात कोणाचा दोष, प्रवासात हे असे कधी तरी होणारच, किती समजुतदारपणा कौतुकास्पद होते. जालंधर, पठाणकोट पंजाबातील शहरे मागे पडत होती, रात्र दाट होत होती, जितु सोबत जागणे भाग होते, झोपाळू गणेशला झोप आवरत नव्हती, बाकी बहुतेक सगळे जागे होते, मार्ग छान होता. पठाणकोट च्या थोडे पुढे आल्यावर जीतुच्या अंगात पासवान शिरला, कोठेतरी बायपास घेतला त्याचा बायपास आम्हाला भारी पडत होता, जीतुशी जास्त वग असल्याने फारसे बोलता येत नव्हते, तरी मी त्याला विचारले कि बायपा
हेलीप्याडला जाण्यास सज्ज टीम
आम्ही सगळे पटकन तयार झालो, १२ वाजता आम्हाला हेलीप्याडवर रिपोर्टिंग होते. सुर्यनारायण आमच्यावर प्रसन्न होते, आकाश निरभ्र झाले , ठराविक वेळेस हेलीकॉप्टरने उड्डाण घेतली, नवीन व आगळाच अनुभव होता, अवघ्या पांच मिनिटात आम्ही १२००० फुट उंच सांझीचत हेलीपॅड वर उतरलो, येथून माता वैष्णोदेविचे मंदिर अडीच कि.मी. अंतरावर होते. डोल्या, घोड्या ह्या सज्ज होत्या, श्वेता व गणेश पायी आले, बाकी कोणी डोली, तर कोणी घोडी हे साधन मार्ग क्रमणासाठी निवडले.
पालकीत विराजमान विद्या
श्वेता, माता वैष्णोदेवीच्या मार्गावर
"अभी तो मै जवान हुं" सुरेश व काकू पोनीवर सवार
मार्ग स्वछ , नीट बांधलेले, आहेत, जाताना दिसणारी दृश्य नयन मनोहर. येव्हढ्या उंचीवर माध्यमिक शाळा होती, स्टाफ ला राहण्यासाठी पक्की घरे पाहून नवल वाटले. येथील डोली खूपcomfortabale एखाद्या सिम्हासानावर बसल्या प्रमाणे भासत होते,' जय माता दी ' च्या घोषात मंदिराच्या प्रवेश द्वारा पाशी आलो, मा चा बुलावा आला होता, आणि तो ही अगत्याचा. दर्शन खूप व्यवस्थित झाले, पुजार्याने त्या पवित्र स्थाना विषयी थोडक्यात माहिती दिली, माथा टेकावयास सांगितले, प्रसाद दिला, प्रसन्न मनाने आम्ही परतीच्या मार्गास आपापल्या डोलीत/घोडीवर विराजमान झालो, पुन्हा सांझीचत ते कटरा अवघ्या पाच मिनिटात परत. माता वैष्णोदेवीच्या दर्शनाचे उद्दिष्ट साध्य झाले होते, आता तेथून चेक औट करणे आवश्यक होते, कारण दुसर्या दिवशी मंगळवार होता, एखाद्या बाईच्या डोक्यात जरी देवीच्या वारी देवीचे स्थान सोडणे शुभ नाही अशी शंका आली असती तर कठीण होते.
हेलीकॅप मधून माता वैष्णोदेवी मार्गाचे दृश्य
१२००० फुटावरील इमारती
आम्ही संध्याकाळी जम्मूचा मार्ग सिधाराला, वेळ वाचवण्याच्या दृष्टीने रात्री ९ पर्यंत होईल तेव्हढे अंतर पुढे जावे असे ठरले, साधारण साठ कि. मी. गेल्यावर जम्मू जिल्ह्यातील कालाकुचा ह्या ठिकाणी पोटपुजे करीता एक बर्यापैकी स्थान आढळले, बाजूला एक म्यारेज हौल होता, सहज सुचले म्हणून चवकशी केली, तर तेथे माफक दरांत रहाण्याची उत्तम सोय असल्याचे कळले, मग काय ठरले इथेच टाका तंबू !!!!
एकेका रूम मध्ये दोन दोन चार चार प्रशस्त बेडस होते. पुढील थांबा डलहौसी फार दूर नव्हता त्यामुळे सगळ्यांनी भरपूर आराम केला व दुसरे दिवशी सकाळी न्याहारी करून निवांत डलहौसी कडे निघालो.
कालाकुचा येथे जेवणाच्या टेबलावर
चहा पीत पीत जितु सोबत पुढील प्रयाणाची योजना
पठाणकोटचे अलीकडेच ऐक वळण डलहौसी कडे वळते, येथून हिमाचल प्रदेश सुरु होतो, एच . पी. मधील बहुतेक पुरुष लाल गोरे, उभ्या चेहर्याचे, धारदार सरळ नाकाचे, थंडीपासून संरक्षणा करीता स्वेटर, जाकेट किंवा कोट घातलेले, व हलकीशी दाढी वाढवलेले शीडशिडीत बांध्याचे व सुंदर आहेत, मुली जरा गोल मटोल बर्याचश्या प्रीती झिनटा सारख्या आढळल्या. शाळा कालेजाचे युनिफार्म्स पांढरी प्यांट, टक इन पूर्ण बाह्यांचा शर्ट व वरून लाल कोट.
घाट रोड चढत डोळ्याने सृष्टी सौंदर्य टिपत, डलहौसी च्या सुभाष चौकात आलो. गेल्या वर्षी बर्याच हिमालयीन प्रवासामुळे घाटरोड, नैसर्गिक सौंदर्य एव्हढी सरावाची झाली होती कि अनुक्रमे त्याची भीती किंवा कुतूहल जरी राहिले नव्हते, तरी त्याचा आनंद लुटावा वाटत होता.
डलहौसी च्या मार्गावर
महाबळेश्वर, शिमला रानीखेत, नैनिताल सारखे डलहौसी हे एक हिल स्टेशन आहें, लॉर्ड डलहौसी ह्याने हे थंड हवेचे स्थान हिल स्टेशन म्हणून डेव्हलप केले. येथील सुभाष चौक म्हणजे शिमला येथील माल रोडवर असलेल्या इंदिरा गांधी चौका सारखे आहें. नेतांजीच्या पुतळ्या मागे, बर्फाने आच्छादित हिमालयाची उत्तुंग शिखरे मध्ये धुक्याची चादर, पटकन ते दृश्य क्यामेर्यात बंदिस्त केले.
अमिताभ-धर्मेंद्र ये दोस्ती हम नही तोडेंगे नेताजींच्या साक्षीने, डलहौसी
कुडकुडत्या थंडीत श्वेता व काकू
डोंगराला सुरुंग लावल्या कारण थांबा
समोरच १०० वर्षे जुने लाकडी बांधणीचे एक हॉटेल होते, तेथे आम्ही जेवणासाठी शिरलो, गरम बासमती तांदुळाचा भात, व पिली दाल खाल्ली , वर गरम चहा घेतला, व बाहेर पडलो. थंडी कडाक्याची होती, खरे तर "ओक व्याली रिसोर्ट" मध्ये एक दिवस रहाण्याचा आमचा प्लान होता, पण थंडीमुळे कोठे बाहेर पडणे अश्यक होते, म्हणून रहाण्याचा बेत रद्द करून परतीच्या मार्गास लागलो. थोड्या अंतरा नंतर आमच्या गाडीचे एक चाक पंक्चर झाले, घाटात, कडाक्याच्या थंडीत, सर्व प्रवाश्याना गाडीतून खाली उतरावे लागले, अर्थात आम्हा उभयताना exemption होते, ओरिजिनल चाकाची जागा स्टेपनीने घेतली. गाडी पुन्हा सुरु, अजून एक फर्लांग पुढे ,गेलो तो गाडीला पुन्हा थांबावे लागले, समोर डोंगराला सुरुंग लावण्याचे काम चालले होते. आम्ही थांबलो तेथे चहाची एक टपरी होती, आम्ही गरम चहा घेतला तोवर मार्ग मोकळा झाला आणि आम्ही धरमाशालेच्या रस्त्यास लागलो.
समोरच १०० वर्षे जुने लाकडी बांधणीचे एक हॉटेल होते, तेथे आम्ही जेवणासाठी शिरलो, गरम बासमती तांदुळाचा भात, व पिली दाल खाल्ली , वर गरम चहा घेतला, व बाहेर पडलो. थंडी कडाक्याची होती, खरे तर "ओक व्याली रिसोर्ट" मध्ये एक दिवस रहाण्याचा आमचा प्लान होता, पण थंडीमुळे कोठे बाहेर पडणे अश्यक होते, म्हणून रहाण्याचा बेत रद्द करून परतीच्या मार्गास लागलो. थोड्या अंतरा नंतर आमच्या गाडीचे एक चाक पंक्चर झाले, घाटात, कडाक्याच्या थंडीत, सर्व प्रवाश्याना गाडीतून खाली उतरावे लागले, अर्थात आम्हा उभयताना exemption होते, ओरिजिनल चाकाची जागा स्टेपनीने घेतली. गाडी पुन्हा सुरु, अजून एक फर्लांग पुढे ,गेलो तो गाडीला पुन्हा थांबावे लागले, समोर डोंगराला सुरुंग लावण्याचे काम चालले होते. आम्ही थांबलो तेथे चहाची एक टपरी होती, आम्ही गरम चहा घेतला तोवर मार्ग मोकळा झाला आणि आम्ही धरमाशालेच्या रस्त्यास लागलो.
धरमशाला दलाई लामाचे स्थान बघण्याची उत्सुकता होती, रस्ता दुरुस्तीचे काम चालू असल्याने, गाडी धीमे चालली होती, थंडीमुळे, निसर्गाच्या हाके साठी सुद्द्धा गाडीबाहेर पडणे जीवावर येत होते, चौ मौ करण्या साठी कांहीतरी हवे होते, तसल्या निर्मनुष्य रस्त्यावर अंधार्या रात्रीत आम्हाला लेहरचे पोट्याटो चिप्स एका छोट्या दुकानात मिळाले, पाणी प्यायला आधार झाला. रात्री साधारण नऊ चे सुमारास धरमशाला हद्द सुरु झाली," मिडवे रिसोर्ट" ह्या सुरुवातीच्या रिसोर्ट मध्ये आम्ही रात्रीचा सहारा घेतला.
मिडवे रिसोर्ट
अनुपम बांगडीया ह्या म्यानेजरने हसत मुखाने आमचे स्वागत केले, चविष्ट जेवण देऊ केले. रिसोर्ट च्या मागे सुंदर डोंगर व त्यातून वहाणारे निर्मल स्वछ झरे पहात झोपेच्या आधीन झालो. सकाळी चेक औट केले, त्या आधी अनुपम कडून येथील प्रेक्षणीय स्थलांबद्दल माहिती गोळा केली. सर्व प्रथम लामाचे भव्य बौद्ध मंदिर बघण्यास गेलो, हजारो तिबेटींअनस त्यांच्या बौद्ध धर्
मंदिरात बुदद्धाची सोन्याची सुंदर मूर्ती आहें, प्रसाद रुपात येथे बिस्किटाचे पुडे देतात.
दलाई लामा मंदिराचे आवार
मिडवे मध्ये दुपारचे जेवण
आवारात आकर्षक वस्तूंची दुकाने आहेत. परतीच्या मार्ग म्हणजे उतार , चढाव व खतरनाक वळणांचा, कांही जागी प्रवाश्याना खाली उतरावे लागते पण मजा वाटते, येथिल कृत्रिम तलाव व नुकतेच बांधलेले क्रिकेट स्टेडीअम पाहून, दुपारचे जेवण उरकून, धरमशालेला सलाम ठोकला व चंदिगढ द वेल प्लानड सिटी च्या दिशेस प्रस्थान केले.
हिमाचल प्रदेशात रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेते, ह्यांचे स्वरूप शेती पेक्षा परसातील बागे सारखे वाटते, शेतात असलेली घरे झोपडी सारखी नाहीत तर टुमदार पक्क्या बांधणीची आहेत, मार्गावर दिसणार्या बर्याच शाळा पाहून येथे शिक्षणाचे महत्व असावे असे वाटले , रस्त्याने तुरळक असली तरी रहदारी आहें प्रवास करताना हे सगळे बघून प्रवास बोर वाटत नाही. धरमशाला ते चंदिगढ पहिले तीस चाळीस कि. मी. रस्ता दुरुस्तीचे सोडल्यास मार्ग चांगला आहें.
बर्फाच्छादित हिमालय
आमच्या प्रयाणाचा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता, हा गुरु गोविंद सिंग ह्यांचा जन्म दिवस. आनंद साहिब हे शीख लोकांचे मोठे गुरुद्वार ह्या मार्गावर आहें. रस्त्यात हज्जारो सरदारजी आपल्या बिब्बे, चायजी, पाजी,कौर व पुत्तर बरोबर निरनिराळ्या वाहनातून जाताना दिसले, आनंद साहिब जसे जसे जवळ येत होते, तशी तशी ही गर्दी वाहनांसाठी गतिरोधक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा