इंदिरा गांधी इंटर न्याशनल विमा
सकाळी ९ वाजता आम्हा
काठमांडू
हॉटेलच्या रस्त्यास लागलो, गाड्यांच्या प्लेट, दुकाने व घरांवरील नंबर चक्क मराठी अंकात , सगळे फलक देवनागरी लिपीत नेपाली भाषेत लिहिलेले नेपाली भाषा ,बरीच बंगालीशी मिळती जुळती असल्याने मला तरी समजण्यास सोपी वाटली व त्यामुळे तेथील लोकांशी बोलणे पण जमले. रस्त्यातील वाहनांचे नियमा विरुद्ध जाणे, रस्त्यांची हालत, आपल्या ओरिसा बिहार किंवा यु. पी. सारखे दाळीद्र पाहून आपण भारता बाहेर आहोत अस वाटले नाही. विमान तळा पासून हॉटेल बर्यापैके दूर होते, सिल्वर होम, थ्यामल प्लेस, पत्यावरून हॉटेल विषयी अपेक्षा जास्त होत्या, पण नाव मोठे, लक्षण खोटे असे कांहीसे हॉटेल पाहून वाटले. परदेशात रहाण्याची सोय होती, हे ही नसे थोडके, असे म्हणून हॉटेलचा आसरा घेतला. आमचे आरक्षण ज्या हॉटेल मध्ये होते, तेथे उतरलेल्या विदेशी पर्यटकांचे विमान डीले झाल्याने रूम्स रिकाम्या झाल्या नव्हत्या, म्हणून आम्हाला बाजूच्या हॉटेल मध्ये अकामोडेत केले होते. थंडी मी म्हणत असल्याने कोठे बाहेर पडावे वाटत नव्हते, चहापाणी, जेवण सगळे रूमवर मागवले, माझी कढी पातळ झाली असल्याने, मी अंथरुणातून बाहेर पडलो नाही. विद्या व मी सोडून सगळे संध्याकाळी बाहेर छोटी चक्कर मारून आले. नेपाळ मध्ये विजेची टंचाई असल्याने, चौवीस तासांपैके दहा तास वीज कपात असते, तरी रात्री वीज असते हे बरे, सोलार सिस्टीम असल्याने, गरम पाण्याचा प्रश्न नव्हता, पाण्याचा रंग लालसर. हॉटेल वरचे जेवण खास नव्हते, पण कोपर्यावर एका बाईचे हॉटेल/जेवणावळ होती, तेथे जेवण छान मिळत होते, दहीभात तर बहोत खूब, राघुकाका तर त्या जेवणावर खूप खुश होते. काका आणि सुरेश मिळून दुसर्या दिवशी नेपाळ दर्शनाची व्यवस्था फायनल करून आले.
दुसरे दिवशी सकाळी फ्रेश वाटलं, आठ वाजता आम्ही सर्वप्रथम, येथील प्राचीन बौध मंदिर बघण्यास गाडीत बसलो, वीस सिटरची गाडी एकदम नवीन व झाक होती, गाडीचा साडेचार फुटी driver दिनेश एकदम हसमुख होता. बौध मंदिराला दीडशे पायर्या असल्याने, दुरून दंडवत केले. आता पशुपतीनाथ मंदिराकडे गाडीची चाके वळवली. प्रवेशद्वारा पासून एक कि.मी. दूर गाडी थांबवून इसके आगे पैदल जाना पडेगा असे फर्मान दिनेशने काढले, माझा सेवक गणेश खाली उतरला, पोलिसाला आमच्या काठ्या दाखवून विनंती केली, हवालदार ने त्याच्या विनंतीस मान दिला, व गाडी पुढे गेली, थोडे पुढे गेल्यावर पुना रुकावट, आता तर पायर्या होत्या, गाडी जाणे शक्य नव्हते. उपाध्यय नावाचा एक पंड्या समोर आला, तो म्हणाला, यहांसे भी आपको काफी चलना पडेगा मी वास्तविक तयार होतो, कारण देव दर्शन म्हटले कि थोडे टाकीचे घाव सोसावायास हवेत, पण विद्या म्याडम ची केस पेशल आहें, गाडी अगदी गाभार्यात नेता आली तरी ति
रुद्राभिषेका नंतर पशुपतीनाथ मंदिर द्वारात
अयोध्येपासून इथपर्यंत वानरसेनेनी आमची साथ सोडली नव्हाती .
वानरसेना सभासद
आम्ही प्रसन्न चित्ताने बाहेर पडलो, जेवण उरकले आणि पुढील पागोडा मंदिराला गेलो. पागोडा ही इमारत बांधणीची एक पद्धत आहें ती कशी हे सांगता येणार नाही पण त्याचे फोटो पाहून नक्कीच कल्पना येईल.
पागोडा बांधणी
दुसरे दिवशी आठच्या ठोक्याला दिनेश आला, आज भक्तपूर पहावयाचे होते, नेपाळ मध्ये लोकशाही अमलात येण्या आधी, भक्तपूर ही नेपाळच्या बादशहाची राजधानी होती . येथे राजाचा पागोडा पद्धतीचा राजवाडा तर आहेच, पण दशभुजा गणपती, महालक्ष्मी, नरसिंह स्वामी इत्यादी देवतांच्या मूर्ती आहेत. देशात कोठेही पौराणिक किंवा ऐतिहासिक स्थानास भेट दिली कि गाईड तेथील स्थानाच्या महत्वा पेक्षा, तेथे कोठल्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले हे प्रामुख्याने सांगतात, तसेच भक्तपुरला सुधा देव आनंद च्या "हरे रामा हरे कृष्णा" ह्या गाजलेल्या चित्रपटाचे ते गोविंदाच्या "घरवाली बाहेरवाली" पर्यंत झालेल्या चित्रिकरणा विषयी सांगण्यात आले. भक्तपूर तसे थ्यामल प्लेस पासून बरेच दूर होते, आम्हाला ११ पर्यंत एअर पोर्ट गाठावयाचे होते, त्यामुळे मध्ये एकदा फक्त चहा साठी थांबून सरळ त्रिभुवन इंटर
भक्तपूर येथे काका सोबत श्वेता
नेपाळी वस्तूंचे दुकान ,भक्तपूर
आमच्या नौ जणांची टीम पुन्हा फरीदाबादला पोंचली, संध्या आमोदने पुन्हा पहिल्याच उत्साहाने आमचे स्वागत केले, चेहर्यावर एकही शिकन नाही. लग्नात वरपक्षाची ठेवावी तशी आमची बडदास्त ह्या उभयतांनी ठेवली, गाद्या गिरद्या, खाणे , चहापाणी, आहेर कशाची कमतरता नाही, तो दिवस संकष्टी चतुर्थीचा होता, केतकराना तीन मेहुणांचा मान करण्याचा मौका मिळाला, आणि आम्हाला जेवणा सोबत विडा दक्षणेचा लाभ. आमच्या टीम तर्फे आम्ही त्याना नेपाळहून आणलेला पितळ्याचा सुबक गणपती दिला, गम्मत म्हणजे, संध्या म्हणाली कि, त्यांच्याकडे गणपती विकत घेण्याची प्रथा नाही, पण कोणी दिला तर त्याचे मन:पूर्वक स्वागत असते, बरे वाटले. असलेल्या एक दिवसाच्या वास्तव्यात संध्याच्या पाक कलेचे बरेच व उत्कृष्ट नमुने आम्हाला चाखावयास मिळाले.
घरेलू अवतारात आमोद सोबत
संध्या व श्वेता क्या पक रहा है
त्यांच्या मेहमान नवाजीचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहें. त्यांचे घर प्रचंड मोठे तर आहेच पण सुंदर सजावटीचा एक उत्तम नमुना सुद्धा आहे, पण त्याहून अधिक मोठे व सुंदर आहें ते त्या उभयतांचे विशाल र्हदय. दुसर्या दिवशी जेवण खाण झाल्यावर, दोन चे सुमारास आम्ही निघालो, सिल्व्हर फ़ौइल मध्ये प्याक करुन्र रात्रीच्या जेवणाची तरतूद देण्यास संध्या विसरली नाही. निघताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटले, ते पाहून आमचेही डोळे पाणावले. पाणावलेल्या डोळ्यानीच आम्ही तिचा निरोप घेतला, गाडी दिल्ली स्टेशन कडे निघाली, मन गेल्या पंधरा दिवसांचा आढावा घेण्यात रमले. पार्किंग पासुन चार नम्बरच्या फलाटावर आम्ही दोघे सामानाच्या ठेल्यावर बसुन आलो, ह्या यात्रेची विशेषता म्हणजे रोपवे पासून हवाई जहाज, आणि डोली पासून ठेल्या पर्यन्त वाहनाच्या सर्व साधनांचा आम्ही उपभोग घेतला. दिल्ली स्टेशन वर आमच्या सुनबाईची आई आम्हाला भेटण्यास आली, येताना आम्हा सर्वांसाठी मिनी बेकरीच बरोबर घेवुन आल्या, त्यानी आणलेल्या, कुकीज, चौकलेटस अजून आम्हाला पुरवठ्यास येत आहेत. सकाळी आकराचे सुमारास जोशी व साठे दाम्पत्य नागपूरला उतरले, आमचा उरलेल्या पांच जणांचा प्रवास हैदराबाद च्या दिशेने सुरु झाला, दिवसा ट्रेनचा प्रवास थोडा कंटाळवाणा असतो, पण आमच्या बरोबर एक तेलुगु लहान कुटुंब होते त्यांची अडीच वर्षांची छकुली दीप्ती, इतकी लाघवी व हुशार होती कि तिच्याशी बोलण्यात वेळ मजेत गेला. संध्याकाळी साडेसातला Secunderabad आले, मुलांनी क्याब बुक केली होती, सुरेशची सून गाडी घेवून त्याला घेण्यास आली होती, जेवणाचे वेळे पर्यंत सर्व घरी सुखरूप पोहोंचलो.
आमची प्यारी सहेली टेम्पो
आमच्या सखीचा सखा वाहन चालक जीतू
आमच्या सर्वांची सखी, आमची टेम्पो, आणि तिचा प्रियकर (वाहन चालक) जितु ह्यांच्या सहकार्या शिवाय आमची हि यात्रा एव्हढी सुखद व सुरक्षित झाली नसती, तेव्हा त्यांचे आभार मानले पाहिजेत. तसेच नूरजहान,सुरैया,लता, आशा,गीता,सुमन,शमशाद ह्या गायिका आणि सैगल,मन्ना,रफी,मुकेश,तलत, हेमंत व किशोरदा हे गायक आमच्या पसंती नुसार गाऊन आमची करमणूक करण्यास चोवीस तास सी.डी रुपात आमच्या सोबत असल्याने आमची यात्रा सुखदच नाही, तर संगीतमय झाली,त्याबद्दल सिनेसृष्टीला सुद्धा मन:पूर्वक सलाम. संगीता शिवाय जीवन म्हणजे मिठा शिवाय जेवण.
आमच्या सुनबाई गझल व चिरंजीव सनी ह्यांनी घर सांभाळण्याची जबाबदारी पत्करून आम्हाला यात्रेस पाठवले तेव्हा आमच्या सफल यात्रेच्या श्रेयात त्यांचा सुद्धा हिस्सा आहे
हे विसरून चालणार नाही.
आमच्या सुनबाई गझल व चिरंजीव सनी ह्यांनी घर सांभाळण्याची जबाबदारी पत्करून आम्हाला यात्रेस पाठवले तेव्हा आमच्या सफल यात्रेच्या श्रेयात त्यांचा सुद्धा हिस्सा आहे
हे विसरून चालणार नाही.
नेपाळला गरिबी लाचारी मुळे , फसवणूक होते, शासकीय अस्थिरते मुळे तेथे केंव्हा कांहीही होऊ शकते असे आम्हाला सांगण्यात आले होते. हवामान ठिक नसेल तर वैष्णोदेवीला हेलीकॉप उड्डाण घेत नाही, हेलीप्याड पासून तीन किलो मीटर चालावे लागते, काठमांडूला जाण्यास पासपोर्ट किंवा इलेक्शन आय. डी. असणे जरुरी आहें (जी विद्या कडे नव्हती) तसेच कडाक्याच्या थंडीशी सामना अश्या बर्याचश्या समस्यां बद्दल आम्हाला निरनिराळ्या लोकांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने सावध केले होते, अर्थातच हे सगळे आमच्या भल्या करिताच. पण " आम्ही सारे एक असू, एकमेका सहाय्य करू " ही टीमची सद भावना व अन्तकरणाच्या खोलीपासून तसेच भक्तीने ओतप्रोत केलेल्या आमच्या यात्रेचे संपूर्ण दिवस आमच्यावर येव्हढे मेहरबान होते कि, कोणाला, कोठेही, कसलाही,कशाचाही त्रास झाला नाही, कांही समस्या आल्याच तरी, त्या चुटकी सरशी सुटल्या . यो
माता वैष्णोदेवी मार्ग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा