सोमवार, २ एप्रिल, २०१२

मां का बुलावा - यात्रेची नांदी

                                                                    
                                                                                  श्री
                   
    ओकांच्या घराचा  सुखकर्ता दुख:हर्ता विघ्नहर्ता श्री गजानन 

मानव जीवना विषयी अशी गाथा आहें कि,
चौर्यांशी लाख योन्यांमधून भ्रमण करून प्राणी मानव जिवनात अवतरीत होतो , मनुष्य जीवन ही सुद्धा खूप मोठी भ्रमंतीच आहें, तरीही एव्हढ्या भ्रमंती नंतर ही त्याची भ्रमंतीची भूक भागत   नाही, आणि तो ऐहिक जिवनात भ्रमंतीची कारणे शोधून   भ्रमंती करतच रहातो .  ह्याला आपण साध्या सरळ भाषेत प्रवास म्हणतो. हा प्रवास कधी लग्न कार्या निम्मित, कधी कुणाच्या मयती कारण, कधी व्यवसाया  निम्मित तर कधी प्रेक्षणीय स्थळे  बघण्या  कारण.        कारण कांहीही असो  प्रवास हा मानव  जीवनातील अविभाज्य घटक आहें,    पण ह्या सगळ्या पलीकडे प्रवासाचा आणिक एक प्रकार आहें, आणि तो म्हणजे तीर्थ क्षेत्रे बघण्या  निम्मित केलेला प्रवास आणि  म्हणूनच कदाचित ह्याला  प्रवास न म्हणता यात्रा असे संबोधतात . प्रत्येक  प्रवास कांही तरी घडवतो, शिकवतो, पुढील वहिवाटी साठी मार्गदर्शन करतो.  लग्न कार्यात मित्र आप्तेष्टांच्या गाठी भेटी होतात, आनंद द्विगुणीत होतो. मयतीत  दु:ख वाटले जाते, व्यावसायिक बाबतीत बहुतेक व्यवहाराच घडतो, प्रवासा साठी केलेल्या प्रवासात नेत्र सुख मिळतेच, पण खर्च केलेल्याचा पूर्ण रिटर्न सुद्द्धा . यात्रेत मात्र आपण व्यावहारिक जगापासून थोडे दूर होतो.  देवदर्शनाची अनुभूती होते, मानसिक समाधान तर par execellence असते. आपला देश एव्हढा विशाल आहें, ३३ कोटी देवांची निरनिराळी स्थाने बघणे एक जन्मात अश्यक्य ,पण तरीही हिंदू धर्माने मान्यता दिलेली १२ ज्योतिर्लींगे, चार धाम, सप्तपुर्या, शक्तिपीठे, दत्तस्थाने, ५ महा सरोवर, पंच महाभूतांची देवळे, इत्यादी तरी बघून माणूस आपल्याला धन्य किंवा पावन समजतो. बालपण खेळ, अभ्यास, मस्ती करण्यात जाते , तारुण्य इश्क़ विश्क़,  प्रापंचिक, व्यावसायीक आणि सामाजिक जीवनाशी येव्हढे निगडीत असते कि, यात्रा सारख्या गोष्टी क्षुल्लक वाटतात.  कवी शैलेंद्र ह्यांनी म्हटले आहें ना "लडकपन खेल मे खोया, जवानी निंद भर सोया "  पण ज्यावेळेस ह्या सगळ्यातून निवृत्ती मिळते,  तेंव्हा मग लक्ष देवधर्म, यात्रा ह्या कडे वळते. आणि  मग " सौ सौ चुहे खाके बिल्ली हज को चली ", म्हटल्या प्रमाणे माणूस आत्ता पर्यंत केलेल्या पापांचे क्षालन करण्यासाठी तीर्थ क्षेत्रांकडे धाव घेतो , आपली पापे धुवून गंगेला मैली करतो. कदाचित ह्या साठी ,  गीतकार रवींद्र जैन ह्याना "राम तेरी गंगा मैली हो गयी, पापियोन्के पाप धोते धोते" असे गीताचे बोल सुचले असावेत.

माझे बालपण हे सुखलोलुप गोष्टींपासून वंचित होते, फक्त वडिलांच्या हुशारीचा वारसा आणि आईच्या पुण्याईची झालर ही पुंजी जीवन घडविण्याचे साधन होते. व्यावसायिक जीवनाचा आलेख मात्र खूप उत्तम प्रकारे रेखाटला गेला, व्यवसाय हे व्यसन बनले व मग इतर गोष्टींकडे दुर्लक्ष झाले, सेवा निवृत्ती नंतर यात्रा कराव्यात असे सरळ गणित मनाने मांडले, पण नियतीला ते मंजूर नसावे, पैसा अडका, वेळ सर्व उपलब्ध होते, पण नव्हते ते आम्हा उभयतांचे स्वास्थ्य. तीन वर्षे जवळ जवळ ह्या सगळ्यात येव्हढे गुंतलो गेलो, कि हा गुंता सुटेल का नाही असे वाटत होते, पण म्हणतात ना कि every  problem  has  a solution , फक्त आपल्याला ते शोधावे लागते.  मी आधी म्हटल्या प्रमाणे बालपणात सरस्वतीचा वरदहस्त वगळल्यास विधात्याने मला सर्व हात राखूनच  दिले होते, सेवा निवृत्ती नंतर माझे सुख चैन त्याने हिरावून घेतले हे त्रिवार सत्य, पण ह्या  परिस्थितीचा बाऊ करावयाचा का त्याला सामोरे जावयाचे असा प्रश्न अनेकदा मनाला विचारला, वाटले ऎन उम्मेदिच्या काळात आयुष्याने जे भरभरून सुख दिले त्याचे काय, त्याची परतफेड आपण  आयुष्याला कशी करावयाची  व त्यातून निर्मिती झाली ती यात्रेच्या कल्पनेची.  कल्पना सुचली  कि त्याला आमलात आणल्या शिवाय चैन नसते, आणि जे करावयाचे ते सिने कलाकार अमीर खान सारखे pefectionist होऊनच, अशी मनाशी खुणगाठ बांधली,  आणि                                              सुरु झाली यात्रेची नांदी.

आमच्या यात्रेची नांदी अगदी लहान प्रमाणात सुरु झाली. तीन वर्षा नंतर  विद्याला घेऊन प्रथमच, कारने ६० कि. मी.  दूर असलेल्या याद्गीरीगुट्टा येथील नरसिम्हा स्वामीच्या दर्शनाने सुरुवात केली. प्रथम यात्रेतच लोकांचे येव्हढे सहकार्य मिळाले कि, वाटले आपण हे कार्य असेच चालू ठेवावे. मार्गात अनेक जागी रेल्वेची गेट्स होती, तेथील लोहमार्ग पाहून विचार आला कि,  हा मार्ग कोठे जात असावा, तो एकीकडे दिल्ली तर दुसरीकडे बनारसला (काशी) जात असल्याचे लक्षात आले, बस्स काशीला जाण्याची योजना मनात आखत घरी परतलो. सरकार एखादे वर्ष महिला वर्ष, तर एखादे बालक वर्ष , एखादे सुरक्षा वर्ष, तर एखादे गरिबी हटाव असे वर्ष जाहीर करते, तसे मी २०११ हे वर्ष आमच्यासाठी यात्रा वर्ष जाहीर केले.

वार्षिक परीक्षे आधी, जशी चाचणी परीक्षा असते, तसे मी काशी यात्रे सारखी दूरची यात्रा करण्या अगोदर शिर्डी व नाशिकला रेल्वे मार्गाने जाण्याचे ठरवले, शिर्डीला साईबाबांचे दर्शन छान  घडले, नाशिकला गांगलांकडे पाहुणचार घेवून परतलो, ह्या वेळेस आम्ही  ६ यात्री होतो. घरी येवून काशी यात्रेची आखणी केली, सौ ताई बरेचदा काशीला जाऊन आली असल्याने तिला माहिती विचारली, तिने माहिती तर दिलीच पण आमच्यां सोबत वसंत रावांसह   येण्याची तयारी दाखवली, छान वाटले,  आता आमची यात्रीकांची संख्या ८ झाली. काशी, गया, प्रयाग अशी आमची त्रिस्थळी यात्रा सफल झाली, थोडक्यात चांचणी नंतर  तिमाही परीक्षेतही आम्ही उत्तीर्ण झालो, आमचा उत्साह आणिक बळावला.
                                                  मणी  कंठ घाट काशी
                                                  प्रयाग येथे वेणीदान

                                                 पिंडदान  गया   मंदिर
एप्रिल उगवला, आम्ही रामेश्वर आणि मीना मदुराईला  भेट दिली,
                                                              रामेश्वर  मंदिराचा परिसर
                                                         विद्या मीना मदुराई मंदिरात
मे भाकड गेला, जून उगवला आणि केदार बद्री पहाण्याची इच्छा बळावली, लड्डा परिवार, नागपूरचे माझे काका काकू अशी नवीन यात्रीकांची नावे आमच्या यादीत नोंदली गेली , ह्या सगळ्या साठी  विद्याला तयार करताना मला बराच प्रयास पडला, पण तो worth होता.  आमचे बहुतेक सभासद सिनिअर होते, माझा उद्देश पण हे सर्व सिनिअर, किंवा निडी लोकांसाठी कोणत्याही अपेक्षे पोटी नाही, तर एक सेवा भाव म्हणून करावयाचे होते, ह्यात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होत होते, आपले उद्दिष्ट साध्य होत आहें, नव्याने सुरु केलेला उपक्रम  योग्य दिशेने जात आहें , पाहून समाधान वाटले. 
                                                      केदार बद्री टीम चोपटा गावात
                                                      श्री केदारनाथ
                                                 श्री बद्रीनाथच्या मार्गावर                 


माणा विलेज, भीम शिला, तिबेट सीमा

                                   
द्वारका, सोमनाथ पुढचे लक्ष्य,
एकंदर २२ सभासद झाले, हे सगळे जमवताना नवीन नवीन अनुभव गाठीशी जोडले जात होते, थ्रील होते, एखाद्या परीक्षेची तयारी केल्याचा भास होता, यात्रा यशस्वी होत होत्या, परीक्षेत पास झाल्याचे समाधान वाटावे, तसे भासत होते, कोठे गोंधळ नाही, वाद विवाद नाहीत केवळ आणि केवळ मजा.
                                      द्वारका सोमनाथ २२ सभासदांची टीम
                                              गोमती नदी, द्वारका
                                    फळांच्या गाडीवर बसून बेट द्वारकेस
ऐकदा कांही  करावयाचे ठरवले तर दैव पण साथ देते, हेतू फक्त चांगला हवा. योगायोग कसा असतो पहा, जून मध्ये उज्जैनचा प्लान केला, पण कडक उष्मा असल्याने रद्द करावा लागला, पण september मध्ये माझ्या मेहुण्याच्या मुलाला भोपाळची मुलगी सांगून आली, लग्न ठरले व खिरवाडकर  ह्यांनी  आम्हाला भोपाळला बोलाविले. "आता उज्जैनी नाम नगरी  राजा विक्रम राज्य करी, तेथील चरित्राची परी ऐका चित्त देऊनिया", शानिमहात्म्यातील सहावी ओवी, वर्षानवर्षे दर शनिवारी डोळ्या खालून जाते, ती  पवित्र उज्जैन नगरी बघण्याचा योग वयाच्या साठीनंतर अशाप्रकारे  आला. विक्रम राजाने जेथे राज्य केले, त्याच नगरीत ओमकारेश्वर आणि महाकालेश्वर अशी, बारा ज्योतीर्लिंगांपैकी दोन अत्यंत महत्वाची ज्योतिर्लिंगे येथे आहेत.  भोपाळ दर्शन तर झालेच , पण ओमकारेश्वर व मामलेश्वर ही दोन ज्योतिर्लिंगे बिनप्रयास घडली, देव जागृत असल्याची जाणीव झाली.           खिरवाडकर मन:पूर्वक आभार.

                         गणेश,अस्मादिक,प्रकाश,उज्जैन मार्गावर एका धाब्या बाहेर
                                                         मामलेश्वर
जे वयाच्या  साठी पर्यंत जमले नाही, ते गेल्या अवघ्या ६ -८ महिन्यात घडले. आता बर्यापैकी यात्रा घडल्या होत्या तेंव्हा बदल म्हणून कश्मीर सफर करण्याची योजना केली, गोंदिकर, भूमकर हनुमंत गद्रे, अशी नवीन सभासदांची नावे आमच्या कंपूत जोडली गेली, कांही जुने सभासद मागे सुटले पण एकूण १३ जणांची टीम कश्मीर मोहिमेवर निघाली,
काश्मीर मोहिमेवर निघालेली १३ जणांची टीम

कपिला शस्ठीचा योग,  १९५४ ते १९५९ मधील शालेय मित्र सौ देऊकुळे पंडित आणि भूमकर मसुरी येथे
सुवर्ण मंदिर अमृतसर

दाल लेक श्रीनगर


गुलमर्ग येथे घुड सवारी
पंडित, विद्या,श्वेता व सेवक गणेश

 लगे हात माता वैष्णोदेवीचे दर्शन घेण्याचे ठरले. सुरुवातीस तेलंगाना आंदोलोन समितीमुळे थोडा घोळ झाला, पण माघार न घेता आम्ही सफरीस सुरुवात केली, मसुरी, आग्रा, फतेहपुर, उदयपुर, अमृतसर असे बघत आम्ही कत्राला पोहोंचलो, पण मा वैष्णोदेवीला कदाचित सहल कम यात्रा मंजूर नसावे, तिने दर्शन देण्यास नकार दिला (साधना अभावी आम्ही वर जाऊ शकलो नाही), येव्हढे गालबोट लागले खरे, पण एकंदरीत कश्मीर सफर सफल संपूर्ण झाली, पण असे अनुभव सुद्द्धा गाठी असणे आवश्यक आहें. आत्ता पर्यंतच्या यात्रांची वर्णने मी  निरनिराळ्या ब्लॉग द्वारे प्रकाशित केली आहेत, संदर्भां खातीर त्यातले कांही अंश येथे नमूद  केले बस्स !
                                       विद्या  पंडित   लग्नाच्या ३३  व्या वर्धापादिनी आग्रा येथे
 फतेहपुर सिक्री सलीम चीस्तींची कबर
                                                             उदयपुर प्यालेस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा