राक गार्डन, चंदिगढ
रौक गार्डन , बेस्ट औट ऑफ वेस्ट हा नेम चंद ह्या एका इसमाने केलेल्या निर्मितीचा उत्तम नमुना. गार्डन म्हटले कि आपल्या डोळ्यांपुढे दिसते ते निरनिराळ्या फुलांची फुलझाडे, एखादे कारंजे, लहान मुलांच्या खेळण्या करीता झोके, घसरगुंड्या इत्यादी, पण येथे तसे कांही नाही, जुन्या ड्रमसने बांधलेली कॉम्पौंड वाल, टाईल्स च्या तुटक्या तुकड्याने, एलेक्ट्रीकल सिरामिक स्वीच चे तुटके अंश ह्याने सजवलेल्या भिंती, बसण्याचे चौक, एकावर एक माठ रचून केलेली पडदा वजा भिंत , कपारी, मोठ्या गोटयान सारख्या दगडाने बांधलेली,अरुंद कृत्रिम वेडीवाकडी दरी, त्यातून वहाणारे पाणी, थोडे चक्रव्यूह सारखे रस्ते, सगळेच और आहे. शब्दात सांगणे मुश्कील, हे अनुभवलेच पाहिजे, तर त्याची मजा. आम्ही अगदी लवकर तेथे गेल्याने, गर्दी नव्हती व आम्हाला सगळे निवांत, मनसोक्त पाहता आले, त्यात हलक्या गुलाबी थंडीमुळे आणिक मजा आली.
तू तेथे मी ,काका काकू राक गार्डन मध्ये
कपार
माठांची पडदा वजा भिंत
टाईल्स च्या तुकड्यांची भिंत
रोज गार्डन, विविध गुलाबांच्या ताटव्याने सजलेली, कारंज्याने नटलेली , आधीच सुंदर असलेल्या चंदिगढच्या सौंदर्याला चार चांद लावते ही गार्डन रात्री विजेच्या झगमटात पाहण्याची मजा न्यारीच. झील चंदिगढ मधील आणखी एक प्रेक्षणीय स्थान, येथे आम्ही कुलचा व हंडी के छोलेची चव घेतली. चंदिगढ मधील रस्ते रुंद लांबच लांब व स्वछ आहेत रस्त्यांच्या दोहो बाजूस भरपूर रुंद फुटपाथ, ते ही हिरवळीने सजलेले, त्यामागे स्वतंत्र घरे, प्रत्येक घरा समोर छोटी गार्डन, सगळेच खूप आल्हाद दायक आहें. ह्याला मिनी अमेरिका म्हणतात ते उगीच नाही.
चंदिगढ शहरातील सुंदर रस्ता
रोज गार्डन मधील गुलाब
सुरेश झाडामागून कुणाशी नजर मिळवतोय
चंदिगढ शिमला मार्गावर कालका जिल्ह्यातील परवाणु हे ठिकाण, हे आमचे पुढील नवलाईचे केंद्र होते, टिंबर ट्रेल हे येथील मेन आकर्षण पांच हजार दोनशे फुटावर जाणारा हा भारतातील सगळ्यात लांब रोप वे आहें. १५ सीटरची, लाल रंगाची आकर्षक व सुंदर गाडी दर्या खोर्यान वरून हळू हळू वर जाते, काचेच्या केबिन मधून दिसणारे दृश्य म्हणजे डोळ्याना मेजवानी. एव्हढ्या उंचीवर, लान टेनिस, मुलांसाठी खेळण्याची विविध साधने, आधुनिक रहाण्याची सोय असलेले हॉटेल, अदबीने बोलणारे वेटर, हॉटेल स्टाफ सगळे कसे हटके आहें. ज्याच्या पाशी वेळ पैसा व ते खर्च करण्याची इच्छा असेल त्याने येथे येवून निवांत आठवडाभर राहावे, दिल खुश होईल. आम्ही २१० रुपयात ३ कप चहा घेण्याचे धाडस करून परतलो. एक आगळाच अनुभव होता.
परवाणु येथील टिंबर ट्रेल
टिंबर ट्रेल मध्ये प्रवासी
त्रैलच्या केबिन मधून दिसणारा नेत्रदीपक नजारा
तो दिवस होळीचा होता, होळी आणि पंजाब क्या बात, पंजाब्यांनी आमच्यावर गुलाल फेकून आमची पण होळी साजरी केली, येताना एका भव्य धाब्यावर जेवणास थांबलो, रंगात रंगलेले युवक युवती लहान मुले ह्यांनी धाब्यावर गर्दी केली होती ,पण जेवणास उशीर झाला नाही.
"धर्म क्षेत्रे कुरु क्षेत्रे समवेता युयुत्सव: मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय"
२१ दिवस सतत यूद्ध झालेली पांडव कौरवांची यूद्ध भूमी कुरुक्षेत्र, मी नऊ वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाहिली होती, मला कारण माहित नाही, पण मला हे स्थान खूप आवडले.
कौरवपीता धृतराष्ट नेत्रहीन
कल्पनेनेच अंगावर शहारे येतात.
रणांगणावर दोन्ही फळ्यानमध्ये आपले गुरु,बांधव,आप्तेष्ट पाहून, अर्जुन लढण्यास कचरला तेव्हा भगवान श्री कृष्णाने त्याला जो उपदेश दिला,तो भगवत गीतेच्या रुपात जाणला जातो, पण त्याचे अगदी संक्षिप्त सार म्हणजे :
"कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन I
मा कर्मफलहेतुर्भूर मा ते संगोSस्त्वकर्माणि "
श्री कृष्ण सांगतात कि, हे पार्थ तुझे कर्तव्य पार पाडण्याचा तुला पूर्ण अधीकार आहे , किंबहुना तुला ते कर्म पार पाडावयास पाहिजेच , फक्त कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता. तसेच तुझ्या कर्मातून जे निष्पन्न होईल, त्यासाठी तू स्वता:ला कदापि कारणीभूत समजू नकोस. ह्या दोन ओळीत द्यानाचे भंडार आहे जे समजण्या एव्हढी आमची पात्रता नाही. कुरुक्षेत्री ह्या ठिकाणी एका वटवृक्षा खाली श्री कृष्णाने सारथ्य केलेला रथ, अर्जुन व श्रीकृष्ण ह्यांचे काचेच्या पेटीतील मुर्ती रूप आपल्याला त्या काळात घेऊन जाते , सर्वच दु:ख दायक, कौरव येथे पराभूत झाले, किती योध्ये कामास आले, युद्धा नंतर श्रीकृष्ण द्वारकेस गेले व तेथूनच निजधामास, पांडव द्रौपदीसह बद्री मार्गे स्वर्गात गेले, त्यामुळे येथे कारुण्य भासते. महाभारत हा एक सूडाचा प्रवास होता, व कोणत्याही सूडाचा शेवट कारुण्यास्पदच असतो. ह्या विषयावर मी बरेच कांही लिहू शकतो पण मी महाभारत विषयावर लिहित नसून, यात्रा निमित्त कुरुक्षेत्री आलो, व ओघाने प्रवास वर्णनात कांही किस्से नमूद करत आहे हे न विसरता, कलमेस रोक देतो.
श्री कृष्ण सांगतात कि, हे पार्थ तुझे कर्तव्य पार पाडण्याचा तुला पूर्ण अधीकार आहे , किंबहुना तुला ते कर्म पार पाडावयास पाहिजेच , फक्त कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता. तसेच तुझ्या कर्मातून जे निष्पन्न होईल, त्यासाठी तू स्वता:ला कदापि कारणीभूत समजू नकोस. ह्या दोन ओळीत द्यानाचे भंडार आहे जे समजण्या एव्हढी आमची पात्रता नाही. कुरुक्षेत्री ह्या ठिकाणी एका वटवृक्षा खाली श्री कृष्णाने सारथ्य केलेला रथ, अर्जुन व श्रीकृष्ण ह्यांचे काचेच्या पेटीतील मुर्ती रूप आपल्याला त्या काळात घेऊन जाते , सर्वच दु:ख दायक, कौरव येथे पराभूत झाले, किती योध्ये कामास आले, युद्धा नंतर श्रीकृष्ण द्वारकेस गेले व तेथूनच निजधामास, पांडव द्रौपदीसह बद्री मार्गे स्वर्गात गेले, त्यामुळे येथे कारुण्य भासते. महाभारत हा एक सूडाचा प्रवास होता, व कोणत्याही सूडाचा शेवट कारुण्यास्पदच असतो. ह्या विषयावर मी बरेच कांही लिहू शकतो पण मी महाभारत विषयावर लिहित नसून, यात्रा निमित्त कुरुक्षेत्री आलो, व ओघाने प्रवास वर्णनात कांही किस्से नमूद करत आहे हे न विसरता, कलमेस रोक देतो.
कुरुक्षेत्र श्री कृष्ण मंदिराचे प्रवेश स्थान
विचारात तल्लीन पंडित
ब्रम्हकुंडा वर सुरेश सोबत श्वेता
कुरुक्षेत्र युनिवर्सिटी , श्रीकृष्णद्वार, कर्णद्वार , अर्जुन्द्वार हे फलक पाहून मला
प्रोफेसराच्या जागी भीष्म पितामाः, व विद्यार्थ्यांच्या जागी पुस्तका ऐवजी धनुष्य बाण घेवून युनिवर्सिटीत कौरव व पांडव प्रवेश करत असल्याचा भास झाला, एखाद्याला ही अतिशययोक्ती वाटेल, पण माणसाची एखाद्या बाबतीत तल्लीनतेने तंद्री लागली तर तो अशी दृश्ये visualise करू शकतो, असा माझा अनुभव आहें . शल्याच्या शय्येवर वर झोपलेले भीष्म व जमिनीत बाण मारून अर्जुनाने त्यांच्या करीता त्यांच्या तोंडात जाणारी गंगा निर्माण केल्याचे मूर्ती रुपात येथे बघण्यास मिळते, तसेच पन्नास फुटी हनुमान प्रवेशद्वारात रक्षक म्हणून असल्याचे आढळते. ब्रम्ह कुण्ड हे पुढचे आकर्षणिय स्थान, एक लाख मनुष्य एका वेळी स्नान करू शकतील येव्हढे प्रचंड मोठे हे कुण्ड, तलाव अथवा सरोवर आहें. तलावाच्या बाजूला मोठ्या ओसर्या आहेत जेथे हज्जारो साधू सन्यासी विश्रांती घेतात, अमावास्येला ह्या कुण्ड स्नानाचे विशेष महत्व असल्याचे सांगण्यात येते. तलावाच्या मध्यात महादेवाचे मंदिर आहें. ह्या आधी हे सर्व आम्ही पाहिले असल्याने आम्ही गाडीतच बसलो, बाकी मंडळी कुंडाकडे , ' कालें घोडेकी नाल का छल्ला' शानिदोष निवारण के लिये असा फलक समोरच्या दुकानात दिसला, जीतुला पाठवून मी एक छल्ला मागवला , पाठोपाठ विद्याने पण. माणूस किती आधुनिक वागला, शिकला सवरला, तरी अंधविश्वासा वरचा त्याचा विश्वास सुटत नाही ,अवघ्या पन्नास रुपयात शनी दोष निवारण स्वस्त होते नाही का ? कुण्ड पाहून ग्यांग परत आली, गरम चहा घेवून सगळे गाडीत बसले, व संध्याकाळी साडे पाचला ला कुरुक्षेत्र सोडले. अमोद केतकर, माझ्या चुलत बहिणीचा नवरा ह्याच्याशी फरीदाबादाला फोन वर काकांचे बोलणे झाले, आम्ही रात्रीच्या मुक्कामास तेथे जाणार होतो, त्याच्या मते आम्हाला पोहचण्यास रात्रीचे ११ वाजले असते जीतुला पण तसेच वाटत होते म्हणून खरे तर तो कुरुक्षेत्र कडे वळण्यास तयार नव्हता. पण रस्ता मस्का होता, शिवाय होळीची सुट्टी असल्याने रहदारी अजिबात नव्हती , त्यामुळे आपण नऊ पर्यंत पोंचू असा माझा कयास होता, म्हणून मी कुरुक्षेत्राचा अट्टाहास केला, योगा योग असेल पण आम्ही डॉट नऊला फरीदाबाद गाठले, केतकराना नवल वाटले , माझा कयास खरा ठरला, गेल्या वर्षभरातील अनुभव कोठे तरी कामास आला.
केतकर पाहुणचार ह्याच्यावर एक निम्बंध नाही तर प्रबंध लिहिता येईल, अगत्य इतके सुंदर व निस्वार्थी असू शकते ह्याची प्रचीती एकदा नाही तर दोनदा आली, ती कशी हे शेवटी. दुसरे दिवशी दिल्लीहून आमची काठमांडूची फ्लाईट होती, सर्वांनी फक्त एक एक कॅबीन ब्याग बरोबर घेवून, बाकी सगळे सामान केतकरांच्या घरी एका रूम मध्ये डम्प केले व दिल्ली विमान तळाकडे धाव घेतली.
संध्या व आमोद केतकर आमचे होस्ट , फरीदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा