शनिवार, १६ जुलै, २०११

दोन धाम यात्रा - बद्रीनाथ ते हिमकुंद

चोपटा गाव मागे पडले, प्रवासातील आठवणींच्या साठ्यात अजून थोडी भर पडली होती,       एक अप्रतिम देखावा दिसला ,प्रत्येकाने तेथे उतरून ते दृश्य क्यामेर्यात बंदिस्त केले. शेवटी रिंकू म्हणाला की इथे इंच इंच सुंदर,  तुम्ही किती वेळ आणि किती जागी थांबणार ? आपल्याला बद्रीला जायचे आहे का नाहीत्याचे म्हणणे १००% बरोबर होते, प्रत्येक दृश निराळे,   मनमोहक.  एक गोष्ट मात्र कौमन होती ती म्हणजे दोन्ही बाजूला उंचच उंच पर्वत
 अलक नंदेची   साथ आणि अरुंद   वळणा वळणाचा रस्ता.    डोळ्यांच्या कॅमेराला  gb किंवा mgb चे बंधन नसल्याने हवे  तेवढे नजारे डोळ्यात साठवून मेमरीत डाउनलोड करता येत होते, फक्त ह्यातून तयार होणारा अल्बम स्वतःपुरता मर्यादित , तो इतर अल्बम सारखा लोकाना दाखवता येण्यासारखा नाही एवढेच.   कितीही आधुनिक कॅमेरा असला तरी त्याला सीम gb ची मर्यादा असते त्यामुळे हवे तेवढे त्याला त्यात  सामावता येत नाही
.निसर्ग  सौंदर्य पहाताना एक लक्षात आले की निसर्ग हा प्रत्येक वेळेस आल्हाद दायक असतोच  असेच नाही, तो कांही ठिकाणी गंभीर पण वाटतो, तसेच आपल्याला त्याच्याशी संवाद साधता येत नाही, आपण ह्या सर्वांपुढे किती थिटे किंवा लहान आहोत ह्याची जाणीव आपल्याला होते.

 रस्त्यात आपल्याला अगस्ती आश्रम, ओखी मठ दिसतो , केदारचे देऊळ महिने बंद असते तेंव्हा ह्या मठात केदारचे मूर्ती पूजन होतेबद्रीला जाण्या आधी हनुमान चट्टी लागते, हे हनुमानाचे देऊळ आहें, देऊळ तसे लहान आहें, पण असे सांगण्यात येते की हनुमानाने येथे ताप केला होता, बद्री नारायणाने त्याला शक्तीचा वर येथे दिला. बद्रीच्या रस्त्यात पांडूकेश्वर  देऊळ आहें, तसेच नंद प्रयाग, कर्ण प्रयाग, विष्णू प्रयाग , देव प्रयाग असे नद्यांचे बरेच संगम बघावयास मिळतात, संगमाला येथे प्रयाग म्हणतात.

 प्रवास प्रगति होत असताना आणिक एक गोष्ट लक्षात आलीती म्हणजे बद्रीचा प्रवास हा केदारच्या प्रवासाहून जास्त कष्टाचा  जोखमीचा आहेकारण इथले रस्ते
 एकतर अरुंद आहेतचशिवाय पावसानी ओले  खडबडीत झालेले, त्याशिवाय ह्या भागात रॉक फॉल land slide सारखे प्रसंग वारंवार होत असतात आणि तश्या  प्रकारचे फलक ही जोगोजागी लावलेले पाहून मनावर जास्तच दडपण येतेपुन्हा एकदा लड्डा चे भजन मनोसामार्थ्या वाढविण्यास कामास आलं. वास्तविकता सगळे घाबरून जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते, पण का , कोण जाणे मला जराही भीती वाटत नव्हती. असो कांहीही विपरीत होता आम्ही १००००' उंचीवर असलेल्या बद्रीच्या पावन भूमीवर पोहोंचलो.   एक देखणा, पांढरे फेक धोतर कुर्ता घातलेला  तेजस्वी मारवाडी पंड्या आम्हाला घेण्यास पार्किंग च्या जागी आला( ही लड्डा ची मेहरबानी होती, म्हणजे त्यांच्या
परिचयाचा होता) त्यांनी आमची रहाणे पोटा पाण्याची उत्तम माफक दरांत व्यवस्था केली.     आम्हाला रहायला जी जागा दिली होती, तेथून बद्रीनाथ मंदिराचे प्रवेश द्वार दिसत होते मध्ये प्रचंड वेगाने वाहणारी अलकनंदा आणि विद्न्यालाला पण तोंडात बोट घालायला भाग पाडेल, असे नदीच्या बाजूलाच वाफा निघणार्या गरम पाण्याचे तप्तकुण्डआम्ही फ्रेश होऊन पिट्टूत बसून दर्शनास गेलो. मी देव वेडा नाही, अंध श्रद्धा हे माझे क्षेत्र नाही, पण का कोण जाणे, बद्रीनाथचे  दर्शन घेऊन मला धन्य झाल्या सारखे वाटले. सर्व यात्रा स्थानी असतात, तशीच इथे पण प्रसाद, वस्त्र आणि पात्रांची तसेच देवांच्या फोटोंची अनेक दुकाने होती, पण ती इतर ठिकाणांपेक्षा व्यवास्थितीत आणि आकर्षक वाटली.

दर्शनानंतर  थोडी बहुत खरेदी झाली, नंतर उत्तम मारवाडी जेवण घेतले, विश्रांती साठी 'मानव भुवन' वर गेलो. नेहमीप्रमाणे झालेल्या प्रवासाचा आढावा घेतला उद्याचा कार्यक्रम आखला शुभरात्र म्हटले. दुसरे दिवशी सकाळी उठून तप्तकुंडात स्नान करून पुन्हां दर्शनाला गेलो. येथे उबदार वस्त्र, तसेच गरुड  मंदिरात  एक लहान मुलाचे कपडे , देवी साठी साडी दान देण्याची प्रथा  आहे , येथे पिंड दानाचे पण महत्व आहे, येथे अभिषेक नाही पण एक पाठ करतात. ज्यांनी त्यांनी आपल्या भक्ती   कुवती प्रमाणे पूजा पाठ केले आणि परतीच्या प्रवासाची तयारी करण्यास हॉटेल वर आलो. बद्री सोडववत नव्हते,
पुन्हा एवढी कठीण यात्रा करणे अश्यक  कोटीतलेम्हणून सर्व बद्री एकदा डोळ्यात साठवली बद्रीचा निरोप घेतला. येथून अवघ्या किलोमीटर अंतरावर , माणा गाव (भारतातील, शेवटचे गाव , नंतर तिबेट बोर्डर , हे बघण्याची उत्सुकता होती.  बहुतेक यात्रा कंपनी येथे येत नाहीत, आम्ही वयक्तिक रीत्या आल्या मुळे आम्हाला सहजपणे जाता आले. माणा हे गाव नुसतेच भारताची सीमा म्हणून प्रसिद्ध  नाही, तर पौराणिक दृष्ट्या सुद्धा
ह्या गावाला खूप महत्व आहे. पार्किंग पासून ते . की. मी. अंतरावर गणेश गुफा आहे. आम्ही कंडीत बसून तेथे पोहोंचलो . व्यास  मुनींनी येथेच बसून महाभारत लिहिले, पुराण लिहिण्यासाठी ह्या ठिकाणी  त्यांनी गणपतीला आव्हान केले, म्हणून ह्याला गणेश गुफा म्हणतात. तेथून पुढे आहे ती भिमाशिला. पांडव ह्याच मार्गावरून स्वर्गात गेले. ह्याच ठिकाणी सरस्वती नदीचा उगम आहे, त्यामुळे ती येथे प्रगट स्थितीत दिसते , बाकी सगळीकडे ती गुप्त आहे, ह्याच ठिकाणी सरस्वतीचे एक छोटे देऊळ पण आहे.   असे म्हणतात द्रोपदी इथे येऊन खूप थकली होती आपल्याला नदी पार करणे कठीण आहे असे ती म्हणाली, तेव्हा भीमाने एक मोठी शिला उचलून त्या नदीवर एक प्रकारचा पूल बांधला, तेव्हा पासून ह्याला भिमाशिला म्हणतात.

माणा विलेज मागे टाकून, आम्ही जोशी मठाच्या रस्त्याला लागलो, जाताना पुन्हा एकदा बद्रीला दुरून वंदन केले, बद्रीहून थोड्या अंतरावर "हिमकुंड साहेब' हे शीख लोकांचे फार मोठे स्थान आहे. महाराष्ट्रात  जसे पंढरीची वारी पायी करतात, तसे ह्या हिमकुंड ला दुरून दुरून सरदारजी  वाहे गुरु करत,   शबद म्हणत  चालत येताना मार्गात दिसतात, अगदी   वर्ष्याच्या बालकापासून ८० वर्षे वयाची माणसे त्या जमावात होती. मला मुळातच पंजाब पंजाबी जमात आवडत असल्याने तेथे जाण्याची प्रबळ  इच्छा होती पण  वेळे अभावी जाता आले नाही, शिवाय तेथे घोडीवर  बसून जावे लागणार होते ,म्हणून दुरूनच ग्रंथ साहिबावर माथा टेकला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा