निसर्गानी जणू आम्हाला सर्व दृश दाखवण्याचा चंग बांधला होता. जोशी मठाला शिवण्या आधीच land slide झाल्याने पुढील मार्ग बंद झाला, आम्ही उघड्या डोळ्यांनी रॉक फॉल बघितला, मोठ मोठाले दगड कोसळून रस्त्यात व नदीत पडत होते . पुन्हा एकदा भीतीचे सावट गाडीत निर्माण झाले. मी आणि रिंकू मात्र रफीची सदाबहार गाणी ऐकत ह्या सर्वांची मजा लुटत होतो, पावसानी पण आमची पाठ सोडली नव्हती. कामगारांचा तांडा तेथे रस्ता क्लीअर करण्यास सज्ज होता, एकूण तीन तासाच्या अवधी नंतर रस्ता मोकळा झाला व हजारो थांबलेल्या गाड्यांनी पुन्हा धीमे धीमे पुढे सरकण्यास प्रारंभ केला. जोशी मठाला ठराविक वेळेलाच गेट उघडतात, आम्ही योग्य वेळेवर गेल्याने तेथे थांबावे लागले नाही. सहा महिने बद्री जेव्हा बर्फा ने कव्हर झालेले असते, तेव्हा ह्या मठात बद्रीची मूर्ती ठेवतात व इथेच पूजन होते. रोप वे बंद असल्याने आम्ही तेथे उतरलो नाही, शिवाय land slide चा धोका क्षेत्र अजून संपले नव्हते.
मार्गात गुप्तकाशीचे देऊळ होते. हे खूप प्राचीन म्हणजे पांडव कालीन क्षेत्र, शंकर भगवानाचे अर्धनारीनटेश्वर रूप येथे आपल्याला बघण्यास मिळते . इथे पुन्हा एकदा मला देवाची अनुभूती झाली. देवळाला ७० ते ८० पायर्या आहेत असे समजले, त्यामुळे, विद्याने गाडीतच बसावयाचे ठरवले . बाकी सगळे पटापट उतरून देव दर्शनाला गेले. मी मोठ्ठा हिय्या करून उतरलो आणि समोरून एक तवेरा वाला आला तो म्हणाला की तुमची गाडी मोठी असल्याने तिथं पर्यंत जाणार नाही , पण लहान गाडी थेट देवळा पर्यंत दुसर्या मार्गाने जाऊ शकेल , मग काय आम्ही विद्या सहित त्यात स्वार होऊन दर्शनास गेलो. उत्तरखंडा मध्ये गुप्त दान देण्याची प्रथा असल्याचे दिसले, कारण केदारला सुद्धा चांदीचे बेलाचे पान व त्रिशूल हे एक गोटया खोबर्याला लहान भोक करून त्यात ह्या वस्तू ठेऊन देवाला दान करतात. गुप्तकाशिला पण पंड्यांनी अभिषेक व्यवास्थितीत केला, पण दान मात्र मुठ बंद करून देण्यास सांगितले.
किती दिले हे बघितले नाही किंवा एवढे द्या असा डिमांड नाही. उत्तर खंडातील प्रवासात एक गोष्ट ध्यानात आली, ती म्हणजे दक्षिण भारतातील देवळां सारखे येथे यात्रेकरूना लुबाडत नाहीत, तसेच इथे भिकमंगे पण खूप कमी आढळतात. आणिक एक म्हणजे देवभूमीवर मला गायीच आढळल्या, म्हैस औषधाला पण दिसली नाही.
गुप्तकाशीचे दर्शन घेऊन आम्ही पुढील मार्ग क्रमणास निघालो, अजून बराच लांबचा पल्ला गाठावयाचा होता, गाडीला ठराविक गती शिवाय जास्त गतीने जाणे मार्गातील अडथळ्यान मुळे शक्य नव्हते. आम्ही पिपलकोटी ह्या गावाला येऊन पोह्न्चलो तोपर्यंत संध्याकाळ तर होत आलीच होती, पावसाची रिमझिम पण थांबली नव्हती आणि आम्ही नुकत्याच आलेल्या मार्गावर दरड कोसळण्याने बद्रीचा मार्ग , आणि आम्हाला ज्या मार्गाने पुढे जायचे होते त्या मार्गावर पण तशीच परिस्थिती असल्याने, पिपलकोटीला थांबा घेणे आवश्यक होते. हॉटेल comfort Inn च्या विवेक नेगी ह्यांनी आमचे स्वागत केले, गाव छोटे असले तरी हॉटेल एक तर नवीन होते आणि सर्व सोयीने युक्त. हॉटेलचे intiriar खूप छान होते, प्रत्येक रूमची रंगसंगती निराळी व आकर्षक होतीच पण तिथला स्टाफ पण सेवेत तत्पर होता. बाजूलाच पोटा पाण्याची सोय होती.
दुसर्या दिवशी, प्रवासात पहिल्यांदाच जरा निवांतपणे उठलो , एक फोटो सेशन झाले आणि ब्रेकफास्ट घेऊनच हरिद्वारच्या दिशेने निघालो. एव्हाना मार्ग मोकळा झाला होता , आकाश पण निरभ्र होते. आजूबाजूला सुंदर दृश्यांची साथ होतीच, पण आता law ऑफ diminishing returns लागू झाला होता, पहिली उत्सुकता थोड्या प्रमाणात कमी झाली होती. देव दर्शने झाली होती, निसर्ग सुख पण भरपूर लुटले होते , आता सगळ्यांचे डोळे दिल्ली कडे लागले होते खरेदी हा एक मोठ्ठा भाग अजून अपूर्ण होता . जे आम्हाला हिरकुंडला जमले नाही ते लहान प्रमाणात का होईना आम्हाला रीन्कुने मार्गात घडवले
एका गुरुद्वाराचे दर्शन तर झालेच पण आम्हाला तेथील लंगर (प्रसाद) चा यत्छेच लाभ घेता आला. शीख लोकांची शिस्त, व्यवास्थितीत पणा आणि मुख्य म्हणजे सेवा भाव मनाला स्पर्श करून गेला. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता ज्या पद्धतीने ते लंगर चा लाभ लोकाना देतात ते वाखाणण्या सारखे आहे. देशात अन्य ठिकाणी पण अन्न छत्र चालतात, पण ह्याची सर त्याला नाही.
लंगर झाले , गाडी हरिद्वार कडे धावायावास लागली, लड्डा परिवार पुन्हा गंगा स्नानाच्या विचारात गुंतला. ह्या परिवाराची अजून एक विशेषता म्हणजे त्याला निरनिराळे पदार्थ खाण्याचे अत्यंत वेड. एक तर बरोबर सगळ्यांनीच खाण्याचे बरेच कांही घेतले होते, पण ह्या भागात मिळणार्या प्रत्येक पदार्थांची ह्याना चव घ्यावयाची होती, ओघाने अर्थातच ते आम्हाला पण चाखायला मिळत होते. ह्या प्रांतात पितळ्याच्या हंड्यात उकडलेले गरम मसाला चणे खूप छान मिळतात, सगळे चाटचे प्रकार , मिठाई , त्याशिवाय जांभळे , काकड्या हे ही स्वस्त आणि मस्त , त्यामुळे आमची पोटाची गिरणी कायम चालू होती.
हरिद्वार आले सर्व मंडळी पुन्हा नदीकडे पळाली, आम्ही उभयता टेम्पोत बसून आजुबाजुंची गम्मत बघत होतो. समोर एक ट्रक होता, ज्याला घराचे स्वरूप दिले होते ,एक बाजले होते, लहान मुलाची झोळी, ट्रेन मध्ये असते तशी झोपायची थ्री टायर रचना. त्या ट्रक मध्ये एकूण किती प्रवासी होते माहित नाही पण एक बाई नॉन स्टोप सगळ्याना पोळी भाजी देत होती, बघताना गम्मत वाटली. पुरणसिंगने आमच्यासाठी जलजीराचे प्याले आणले. रिंकू आठ दिवस वाढलेली दाढी साफ करण्यास न्हाव्या समोर बसला. कोणी लहान मुलांसाठी फुगे खेळणी विकत होते कोणी कपडे तर कोणी खाण्याचे पदार्थ, एकूण आपण चित्रपटात बघतो तसे इथे मेळ्याचे स्वरूप होते. मंडळी गंगा स्नान उरकून, बाटलीत,गंगेचे पाणी घेऊन परतली, येताना रबडीचा मोठा डब्बा आणण्यास लड्डा विसरले नाहीत, नशीब लगेच तिथेच उघडला नाही. अर्ध्या पाउण तासात आम्ही ऋषिकेशला पोहोंचलो लाईटच्या झगमटात राम झुला, लक्ष्मन झुला, त्या खालून वाहणारी पवित्र गंगा पाहिली , आणि साधारण रात्री १० च्या सुमारास TTD च्या धर्म शाळेत उतरलो. येथे प्रथम गरम गरम आंध्रा जेवणाचा स्वाद घेतला आणि मग तेथील व्यवस्थापक (जो माझा फक्त फोन मित्र आहे) त्यांनी आम्हाला दिलेल्या VIP रुम्सचा ताबा घेतला, देव्भूमिवाराचा आमचा हा शेवटचा थांबा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा