सकाळी जरा निवांतच तयार होऊन देव दर्शन घेऊन बाहेर पडलो, बाजूलाच एक भव्य गुरुद्वारा होता, रिंकू येथे माथा टेकावायास गेला येताना माझ्यासाठी एक कडे आणले, त्याच्या किमती पेक्षा त्याने आपल्या साठी आठवणीने कांही आणले ह्याने मन भरून आले. रिंकू दिल्लीचा असल्याने बायको व त्याच्या छोट्याश्या गुडियाला (मुलगी) आठ दिवसांनी भेटण्याची त्याला घाई झाली होती, हृषीकेश ते दिल्ली अंतर २२० किलोमेतर आहे , पण मीरट सोडल्यास रस्ता चांगला होता म्हणूनn मग त्यानी गाडीला गती दिली. मार्गावर 'शीतल धारा' धाब्यावर मिसी रोटी, mixed सलाड, जीरा राइस बाजल्यावर बसून खाल्लाच पण त्या आधी
हरिद्वारहून आणलेल्या रबडीचा वाटप झाला हा धाबा आता शेवटचा थांबा आहें,व ह्यानंतर एकदा फक्त चहा साठी थांबवून सरळ दिल्ली गाठणार असे रीन्कुने निष्कून सांगितले. मीरतच्या जवळपास चहासाठी थांबलो, पण वातावण थंड असून सुद्धा चहा ऐवजी शिकंजी प्यायलो. शिकंजी सुद्धा ISO 9000 certified असू शकते हे इथे समजले. आपले लिंबाचे सरबर असते तसेच पण प्याक्ड , आणि एक विशिष्ट प्रकारच्या मसाल्याने युक्त चविष्ट शिकंजी सगळ्यांच खूप आवडली. येथून गाजियाबाद मार्गे दिल्लीला रात्री ११ वाजता पोह्न्चलो. पहाडगंज मध्ये हॉटेल बुक केले होते.
सकाळी जरा उशिरानेच तयार झालो, एक तर दिल्लीतील दुकाने उशिरा उघडतात, दुसरे म्हणजे सर्व सामान नीट आवरून टेंपोत ठेवायचे होते, कारण खरेदीनंतर सरळ स्टेशन गाठायचे होते. येथे आमच्या दोन टीम झाल्या, एक टीम खरेदीला गेली, व एक गूडगावला आमच्या व्याह्यांकडे (आमची सुनेचे माहेर तेथे आहें). पंजाबी पाहुणचार वर्णन करायला एक पन्ना कमी पडेल. पंजाबी जेवणाचा स्वाद तर घेतलाच, पण निघताना त्यांनी आमच्या पूर्ण युनिट साठी रात्रीच्या जेवणाचे पार्सल (प्लेट, वाट्या, चमचे इत्यादी सहित) दिलेले पाहून आश्यर्य वाटले. आपण एखाद्या पाहुण्याला डबा देताना सुद्धा किती गवगवा करतो.
गूडगावचा निरोप घेवून दुपारी ४ चे सुमारास दिल्ली स्टेशन गाठले, आमची दुसरी टीम सारा पालिका बाजार खरेदी करून स्टेशनवर आमची वाट पहात होती. रिंकू व पुरणला निरोप द्यावयाची वेळ आली. एक आठवड्याची फक्त त्यांची साथ होती, पण त्याना निरोप देताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या, गाडीत चढून स्थिरस्तावर झालो, रात्री गूडगावच्या जेवणावर हात मारला व आपापल्या बर्थवर आडवे झालो. नागपूरला काका काकू उतरले, व आम्हा उरलेल्या हैदराबाद करांचा प्रवास हैदराबादच्या दिशेने सुरु झाला. साधारण २ च्या सुमारास कागजनगर आले. लड्डा च्या भावाची ही सासुरवाडी, येथे पुन्हा गूडगावच्या पाहुणचाराची प्रतिकृती झाली. संपूर्ण ग्यांग साठी दुपारचे गरम गरम मारवाडी जेवण आले. पोटाची नुसती रेलचेल चालली होती. प्रवासातील गोंधळाची सांगता तिकिटे हरवण्यांनी झाली (एकदा चेक झाल्यावर) , पण पुढे आम्हाला कोणी तिकिटे विचारली नाहीत, अगदी स्टेशनातून बाहेर पडताना सुद्धा. हैदराबादला मुसळधार पावसाने आमचे स्वागत केले. तश्या पावसात लड्डा परिवाराने आम्हा सगळ्यांचे गळ्यात हार घालून वयोमर्यादा न पाहता सगळ्याना नमस्कार करून स्वागत केले, कौतुकास्पद वाटले . सनीने पटकन आम्हाला उतरवून आडोश्याला उभे केले. सुनेने सामानाचा ताबा घेतला. एक मेकांचे निरोप घेऊन सगळे आप आपल्या घराच्या दिशेने वळले.
घरी आल्यावर सुनेने औक्षण करून स्वागत केले, डोळ्यात आनंदाश्रू दाटले, गरम कॉफी घेतली, हात पाय धुवून देवाला नमस्कार करून जेवणास बसलो. रात्री १२.३० पर्यंत जेवणाच्या टेबलावर गप्पा रंगल्या. प्रवासाच्या थकव्यामुळे छान झोप लागेल असे वाटत होते, पण डोळ्याला डोळा लागेना, आठ दिवसाच्या आठवणी पिच्छा सोडत नव्हत्या आणि त्यातूनच निर्मिती झाली , ते हे प्रवास वर्णन.
ह्या यशस्वी यात्रेचा मूलमंत्र होता साथी हात बढाना