शिशा (कांचेची घरे)
घर बदलण्याच्या निमित्याने, घरातील सामानाची आवरा आवर चालली होती. घर विदारले होते,
माळ्यावर असलेल्या क्वचित वापरल्या जाणार्या, किंवा कधीच वापरात न आलेल्या वस्तू, आपल्याआरक्षित व सुरक्षित अप्पर स्लीपर वरून लोवर स्लीपर नाही तर चक्क जमिनीवर आल्या होत्या.ह्या वस्तू आपण कालांतराने बाहेर काढतो, पुन्हा धुवून पुसून वर ठेवतो. त्यातील कित्येक वस्तू आपण आयुष्यभर वापरणार नसतो, पण त्या फेकववत नाही, कारण प्रत्येक वस्तू मागे एखाद्या आठवणीचा धागा वेढलेला, गुंतलेला किंवा अडकलेला असतो.
नेहमीच्या शिरस्त्याने गणेश सामान काढत होता, मी निरीक्षण करून सामान सेग्रीगेट करत होतो.
काम करताना रेडियो चालू ठेवणे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे , SMS के बहाने VBS के तराने
कार्यक्रम चालू होता, 'शिशा हो या दिल हो आखिर तुट जाता है', जितु, रीना रौय अभिनित चित्रपटाचे गीत चालू होते, मी थोडेसे मागे गेलो, 'शिशाये दिल इतना ना उच्छालो, ये कंही तुट जायेगा, ये कंहीफुट जायेगा' मीना कुमारी अभिनित 'दिल अपना और प्रीत परायीचे गीत आठवले, नंतर किशोरदा च्या आवाजातील 'अगर दिल हमारा शीशे के बदले पत्थर का होता, ना तुटता ना फुटता ' गीताचे बोल आठवले आणि सुरु झाली माझ्या विचारांची भ्रमंती. शिशा म्हणजे कांच इतकी नाजूक असते कि जराश्या आघाताने तिला तडा जावू शकतो, ती तुटू शकते. मला कांच आणि नाती ह्यांच्यात बरेचसे साम्य आढळते. एकदा तडा गेला कि दरार आलीच.
म्हणूनच
HANDLE WITH CARE दोहोंच्या बाबतीत समानतेने लागू आहे.
माझ्या मुंजी पासून , माझे लग्न ,मुलांची बारशी,वाढदिवस, मुलाची मुंज, लग्न, अनेक विविध कार्या निमित्त आहेर रुपात आलेली विविध धातू.आकार व प्रकारची भांडी माझ्या पुढ्यात होती, ती भांडी माझ्याशी बोलत होती, ऐक ऐक भांडे उचलून हातात घेत मी त्या त्या प्रसंगात रमत होतो, आठवणी सारखी दुसरी ठेव नाही, किती खर्चले तरी ही ठेव संपत नाही उलट त्याची वृद्धीच होते.
मला आठवले माझे बालपण, आई गोष्टी सांगावयाची, त्यातील राजाच्या राजवाड्यात सोन्या चांदीची भांडी असावयाची, त्या काळात , त्याचे दर्शन पण आम्हाला दुर्मिळ होते, त्या वेळेस बहुतेकांचे संसार पितळ्याचे होते, I mean बहुतेकांच्या घरी ऐक तांब्याचा बंब वगळल्यास, पितळ्याचीच भांडी असावयाची. अलुमिनिअम बहिष्कारात होते,कारण ती ईतर जमात वापरत असे, स्टील आपले साम्राज्य जमवू पहात होते. कोणाच्या घरी चार चकाकणारी स्टीलची भांडी असली म्हणजे तो श्रीमंत गणला जायचा, कारण नवीन असल्याने स्टील तेंव्हा खूप महाग होते, व त्यामुळे त्याचे अप्रूप. लग्न कार्यात ही भांडी आहेर रुपात दिली जात. जसा जसा काळ पुढे जात होता, तसे स्टीलचे वारे जोरात वाहू लागले, गोर गरिबांच्या घरी पण स्टील प्रवेश करू लागले. पुढे अलुमिनिअम ची जागां इंडालिअम ने घेतली,अलुमिनिअम ची सुधारून वाढवलेली आवृत्ती, घरोघरी ह्याचे आगमन झाले, थोडक्यात अलुमिनिअम वरचा बहिष्कार उठला. पण इंडालिअमचा वापर मर्यादितच होता, स्टील आपले स्थान टिकवून होते.
मग नवयुग आले, व घरोघरी काचेच्या भांड्यांचे प्रस्थ वाढले, फ्याशन , आधुनिक वागणी, स्टाइल ह्या नावा खाली मद्य प्याले व बाटली पर्यंत मर्यादित असलेली कांच , देव घरा पर्यंत पोहन्चली, अगदी, देवाच्या मूर्ती पासून उपकरणानपर्यंत. आहेर रुपात आता लेमन सेट, ओव्हनची भांडी, डायनिंग सेट, कांचेच्या मूर्ती इत्यादीची देवाण घेवाण सुरु झाली.घराची दारे खिडक्या, टोलेजंग इमारती सगळे कांचमय झाले, दिसण्यास आकर्षक पण जपण्यास इभ्रती सारखे कठीण.बदल ही काळाची जरुरत आहे, हे मान्य, पण मजबूती, टिकाऊपणा ह्या गोष्टी तेव्हढ्याच महत्वाच्या आहेत नाही का ?
धातूची ऐक ऐक वस्तू उचलून त्यात रमताना, ती वस्तू हातातून निसटली, तरी फार तर त्याला पोचा येईल, ती फुटणार नाही ,पोचा काढता येईल, नाती टिकवता येतील, दरार आली तर मिटवता येईल. पण काचेच्या वस्तूंचे काय, आठवणींची उजळणी करण्यासाठी ती टिकली पाहिजेत, आणि एखाद वेळेस टिकली व आपण आठवणींच्या तंद्रीत असताना हातातूनपडली, तर संपले, ती वस्तू व त्या आठवणी, दोन्ही काळाच्या ओघात विरून जातील. आजची नाती सुद्धा काचेच्या वस्तू सारखी आहेत, चली तो चांद तक नही तो शाम तक. ह्या पुढे येणारा काळ युज अंड थ्रो चा तर नसेल ना अशी ऐक भीती मनात घर करतेय, तसे झाले तर संपलेच, वस्तू तर वस्तू पण नाती सुद्धा "गरज सरो अन वैद्य मरो" म्हणी प्रमाणे संपुष्टात तर येणार नाहीत ना?
आशा वाटते असे होणार नाही, कारण फ्याशन, हायजीन , सजावट ह्या निम्मित, पितळ व तांब्याचा प्रवेश पुन्हा घरोघरी लहान प्रमाणात का असेना होवू पहात आहे, रहाट गाडग्या प्रमाणे पुन्हा ह्या गोष्टी परत येतील, नव्या गोष्टींचे स्वागत जरुरी आहे, पण त्या सोबत जुन्या गोष्टी जोपासणे पण तितकेच महत्वाचे आहे .

शेवटी जुने ते सोने हे खरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा